Pimpri : पूर्ववैमनस्यातून रिक्षा चालकाला मारहाण करत रिक्षाची तोडफोड

एमपीसी न्यूज- जुन्या भांडणाच्या रागातून तिघांनी एका रिक्षा (Pimpri)  चालकाला मारहाण करत रिक्षाची तोडफोड केली आहे ही घटना गुरुवारी पिंपरी येथे घडली आहे.

Pimpri : फोन परत मागितला म्हणून तरुणावर कोयत्याने वार

याप्रकरणी विजय जनार्दन खेडेकर (वय 36 राहणार पिंपरी) यांनी फिर्याद दिली असून अनिकेत वाघमारे हितेश बारच्या उर्फ वाल्मिकी व यश सर्व राहणार पिंपरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी यश याच्यासोबत फिर्यादी यांचे भांडण झाले होते याच भांडणाच्या रागातून तिघांनी फिर्यादी यांना हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण करत रिक्षाची काच फोडली यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Pimpri)  आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.