MNS : मनसेची ‘एक सही संतापा’ची मोहीम; सही करत नागरिकांचा संताप

एमपीसी न्यूज – राज्यात गलिच्छ राजकारण सुरू असल्याचा (MNS) आरोप करत लोकांच्या मनातील संताप व भावना व्यक्त व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक ‘एक सही संतापा’ची मोहीम हाती घेतली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात या मोहिमेची सुरुवात पिंपरी चौकात आज (शनिवारी) करण्यात आली. नागरिक मोठ्या संख्येने सही करत संताप व्यक्त करत आहेत.

पिंपरीत या ‘एक सही संतापा’ची मोहीमची सुरुवात शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. यावेळी रुपेश पटेकर, (MNS) उपाध्यक्ष बाळा दानवले, राजू साळवे, सीमा बेलापुरकर आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

पिंपरीतील फलकावर काही तासात नागरिकांनी सह्या करत सध्या सुरू असलेल्या राजकारणावर संताप व्यक्त केला आहे. एकदा मतदान केले की तुम्हाला पाच वर्षे गृहीत धरणार का, राजकारणाचा चिखल झाला आहे का, माझ्या मताला काही किंमत नाही का, या घटनांचा तुम्हाला राग येत नाही का, चिड येत नाही का, संताप येत नाही का, जर येत असेल तर ..! एक संतापाची सही करा असा मजकूर फलकावर आहे.


राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडी होत आहेत. राज्यातील राजकारणाची नैतिकात संपली आहे. सत्ता प्राप्तीसाठी शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेतले जात आहे.

सत्तेसाठी अनैतिक आघाडी, युती केली जात आहे. त्यामुळे मतदाराचा अपमान होत असल्याने या मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सांगितले.

सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थिती पाहता, राज्यात जे गलिच्छ राजकारण चालू आहे, हे सर्व पाहता  त्याचाच एक  भाग लोकांच्या मनातील संताप व भावना व्यक्त व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला असून नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याचेही ते म्हणाले.

Pune : कोणत्याही नेत्यांमध्ये पक्षनिष्ठा दिसत नाही, पुणेकर नागरिकांचा सवाल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.