Pimpri : डुक्कर पकडल्यावरून महापालिकेच्या पशु रुग्णालयात तोडफोड

एमपीसी न्यूज – डुक्कर पकडल्याच्या कारणावरून दहा जणांच्या टोळक्याने महापालिकेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात तोडफोड केली. ही घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी पिंपरी येथे घडली.

करूपस्वामी व्ही. विरअन्नन (वय 38, रा. बाळासाहेब ठाकरे सभागृह, यमुनानगर, निगडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश, सागर आणि त्यांच्या आठ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरात मोकाट फिरत असलेल्या डुकरांना पकडण्यासाठी पशु वैद्यकीय विभागाकडून एक पथक परराज्यातून बोलावण्यात आले. याबाबत मोकाट फिरणा-या डुकरांच्या मालकांना माहिती मिळाली. मंगळवारी दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास आरोपी महापालिकेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आले. डुक्कर पकडण्याच्या कारणावरून त्यांनी लाकडी दांडके तसेच दगडाने फिर्यादी व त्यांच्या सहकारी कामगारांना मारहाण करून जखमी केले. तसेच कार्यालयातील संगणक व इतर वस्तूंचे नुकसान केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.