Vadgaon Maval : बाफना डी.एड.काँलेज मध्ये साजरा झाला अविस्मरणीय माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील हरकचंद रायचंद बाफना डी.एड् कॉलेजमध्ये बुधवारी (दि. 28) अविस्मरणीय क्षणांनी माजी विद्यार्थी स्नेहमेळावा साजरा झाला.

1992 ते 94 दरम्यानचे 70 माजी विद्यार्थी 25 वर्षांनी एकत्र आले. इतक्या वर्षांनी भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. कॉलेज जीवनातील अनेक कटू – गोड आठवणींना उजाळा देत, सर्वांनी एकमेकांची नव्याने ओळख करून घेतली. ईशस्तवन, स्वागतगीत, प्रास्ताविक, पाहुण्यांची भाषणे, विद्यार्थ्यांची मनोगते, मनोरंजक उपक्रम असा कार्यक्रम घेण्यात आला.

असाच महामेळावा पुन्हा घेतला जावा, व त्या मध्ये 1990 पासूनच्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करावे अशी भावना संस्थेचे सचिव अशोक बाफना यांनी व्यक्त केली. माजी प्राचार्य धायगुडे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन कॉलेजचे ग्रंथालय दत्तक घेऊन पुस्तकांची मदत करावी असा मनोदय व्यक्त केला.

कोल्हापूर डाएटचे प्राचार्य डॉ. शेख यांनी त्यांचा संघर्षमय जीवनपट उलगडला सर्वांनाच त्यातून प्रेरणा मिळाली. एकमेकांना भेटणे या एकाच उद्देशाने 70 जण एकत्र आले होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी कॉलेजला क्रीडा साहित्याची भेट दिली. सर्वांना भावी जीवनाच्या व प्रगतीच्या शुभेच्छा देत, एकमेकांच्या खंबीर आधाराची साक्ष देत व पुन्हापुन्हा भेटत राहण्याचा विश्वास देत परस्परांना निरोप दिला.

कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, सचिव अशोक बाफना, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, माजी प्राचार्य धायगुडे, कोल्हापूर डाएटचे प्राचार्य डॉ. शेख प्राचार्य लंघे व डोके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश धानापुनेयांनी केले. सुत्रसंचालन मुकुंद तनपुरे यांनी केले, तर आभार विजय गायकवाड यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.