Pimpri : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व लुई ब्रेल यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – अंध अपंग असोसिएशन संस्थेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि लुई ब्रेल यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिनकर गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

युवा संघटक अलोक गायकवाड यांच्या शुभहस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला .

यशवंत कण्हरे म्हणाले,अंध अपंगांना मदत करणे डोळस समाजाची जबाबदारी आहे. अंध अपंगांची सेवा हि खरी ईश्वर सेवा आहे .त्यांची सेवा हे पुंण्याचे काम आहे .

यावेळी आप्पा उर्फ दिनकर गायकवाड म्हणाले, आयुष्यात अंध अपंगाची सेवा करत आहे. मी स्वतः अंध आहे. अंध अपंग मुलासाठी वसतिगृह व शाळा काढणे हे माझे ध्येय आहे. अंधांसाठी लुई ब्रेल यांचा पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पुतळा उभा करावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.आर.माडगूळकर यांनी केले. प्रदीप गायकवाड यांनी आभार मानले . या कार्यक्रमात एच डी निकम ,अलोक गायकवाड जयराम दहातोंडे ,नरेंद्र निकाळजे ,किरण गायकवाड , रुक्मिणी चिहेवार, शंकर बोरकर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.