Nigdi : ब्रॉड क्रेझी स्पोर्टस क्लब कॅरम असोशिएशन तर्फे आमदार चषक स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज – ब्रॉड क्रेझी स्पोर्टस क्लब तर्फे ( Nigdi) निगडी प्राधिकरण  येथे दोन दिवसीय  आमदार चषक कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 200 हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता. यावेळी तीनवेळा विश्व विजेता ठरलेला योगेश परदेशी , शिवछत्रपती पुरस्कार विजेते अनिल मुंडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिजीत त्रिपणकर यांनी देखील यावेळी सहभाग नोंदवला.

Pune : शिवीगाळ करत मारहाण केल्याने एकाने मित्राचा केला खून

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार उमा खापरे  तसेच भाजपचे क्रीडा अध्यक्ष जयदीप खापरे तसेच असोसिएशनचे पदाधिकारी खजिनदार सुदामती दाभाडे व उपकार्याध्यक्ष रावसाहेब कानावडे  आदी उपस्थित होते.यावेळी मंदार कुलकर्णी, भाई साने, योगेश परदेशी, अनिल मुंडे, सुशिल गुजर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुत्रसंचालन रावसाहेब कानावडे यांनी केले.

यावेळी विजेत्यांना 10 हजार रुपये रोख बक्षिस म्हणून देण्यात आले. बक्षीस समारंभासाठी ब्रॉड क्रेझी स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी (Nigdi) उपस्थित होते.

विजेत्या खेळाडूंची नावे खालील प्रमाणे –

पुरुष गट

प्रथम क्रमांक – अनिल मुंडे

द्वितीय क्रमांक –अभिजीत त्रिपाणकर

तृतीय क्रमांक -.योगेश परदेशी

चौथा क्रमांक – रहीम खान

पाचवा क्रमांक उमर अन्सारी

सहावा क्रमांक हरुन शेख

सातवा क्रमांक – चांद शेख

आठवा क्रमांक –रवी धिंग्रा

महिला गट 

प्रथम क्रमांक – पुष्करणी भट्टड

द्वितीय क्रमांक – तुलिका चौरसिया

तृतीय क्रमांक -. श्रृती वेळेकर

चौथा क्रमांक – मेघा मढकरी

पाचवा क्रमांक – तनया पाटील

सहावा क्रमांक –  ज्ञानेश्वरी इंगुळकर

सातवा क्रमांक –  श्रावणी तांबे

आठवा क्रमांक – गार्गी बर्वे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.