Pune : शिवीगाळ करत मारहाण केल्याने एकाने मित्राचा केला खून

एमपीसी न्यूज –  दारूच्या नशेत शिवीगाळ करून मारहाण (Pune) करणाऱ्या एका व्यक्तीचा त्याच्या मित्रानेच खून केला. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली. नसीम सइदुल्लाह खान, वय 37) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी कमल रोहित ध्रुव (वय 19 वर्षे, रा.लेबर कॅम्प, कामठेनगर, पुणे) त्याला अटक केली आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत नसीम आणि आरोपी कमल दोघेही कोंढवा परिसरात टाइल्स फिटिंग करण्याचे काम करतात. एकाच खोलीत ते राहत होते. मयत नसीम हा वयाने मोठा असल्याने कमल याला घरातील सगळी कामे सांगायचा. तसेच स्वयंपाक करायला लावायचा. काही कमी जास्त झाल्यास मारहाणही करायचा. यामुळे कमलच्या मनात नसीम विषयी राग होता.

Moshi : जीवनात कर्मयोगाचे श्रेष्ठत्व सर्वात जास्त आहे.- हभप बाळासाहेब महाराज रंजाळे

मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे दोघात याच कारणावरून भांडण झाले. नसीम याने दारूच्या नशेत कमलला शिवीगाळ केली. आणि घराबाहेर निघाला. रागात असलेल्या कमलने त्याचा काटा काढण्याचे ठरवले. तो ही घरातून त्याच्यापाठोपाठ गेला. दारूच्या नशेत असलेल्या नसीमला त्याने मारहाण करत गळा आवळून खून केला.

त्यानंतर पुन्हा घरी येऊन झोपी गेला. दुसऱ्या दिवशी पोलिसांना नसीम याचा मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली असता कमल ध्रुव याची नाव समोर आले. पोलिसांनी त्याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करत (Pune) आहे.

 

https://www.youtube.com/watch?v=PgIBWVfvvUw&t=42s

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.