Moshi : जीवनात कर्मयोगाचे श्रेष्ठत्व सर्वात जास्त – हभप बाळासाहेब रंजाळे महाराज

मोशी- संतनगर, मोशी प्राधिकरण मध्ये भक्ती-शक्ती संगम या अभिनव उपक्रमानिमित कीर्तन

एमपीसी न्यूज – रविवार दि.7 जानेवारी 2023 रोजी, संतनगर मित्र मंडळ ( Moshi ) आयोजित भक्ती – शक्ती संगम या अभिनव उपक्रमाचे 161 वे पुष्प भागवताचार्य ह भ प बाळासाहेब रंजाळे महाराज यांनी गुंफले. कीर्तन कार्यक्रमाच्या अगोदर श्री वटेश्वर महिला भजनी मंडळ गवळीनगर, भोसरी च्या प्रमुख हभप सौ चंद्रकला (आशा) महादेव वाळुंज व सहकारी महिलांनी सुश्राव्य अशी भजन सेवा सादर केली.

यानंतर स्वरभास्कर भागवताचार्य बाळासाहेब महाराज रंजाळे यांनी कीर्तन सेवा करताना देहू – आळंदी च्या मध्य भागातील संतनगरच्या पवित्र अशा परिसरात नावाला साजेल असे कार्य केले जात आहे. अध्यात्म व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी आपले आराध्य दैवत श्री.छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांच्या सहकार्याने उभारलेले गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी भूगोल फाउंडेशन चे अध्यक्ष  विठ्ठल नाना वाळुंज व सहकारी करत असलेल्या छोट्याशा कामाचेही कौतुक केले व अयोध्येत भव्य असे प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारले जात आहे व याच वर्षी श्रीराम भक्त हनुमानाचेही मंदिर या संतनगर मध्ये उभारले याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करून सहकार्य करणाऱ्यांचे कौतुक केले.

PCMC : ई-गव्हर्नन्स निर्देशांकात पिंपरी महापालिका राज्यात प्रथम

जीवनात कर्मयोगाचे श्रेष्ठत्व सर्वात जास्त आहे.जीवनात नम्रपणा पंचतत्वाचा अंगीकार केल्यावर ( Moshi ) येतो मगच जीवन यशस्वी होण्यास सुकर होते.यावेळी भोसरीचे प्रथम आमदार विलासराव लांडे पाटील, स्थायी समिती माजी अध्यक्ष  विलास मडेगिरी, माजी नगसेवक  संजयशेठ वाबळे, युवा नेते योगेशभाऊ लोंढे, निगडी यमुनानगर येथील माजी नगरसेवक, शशिकिरण गवळी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख  निलेश मुटके,प्राचार्य शिवलिंग ढवळेश्वर सर, ग्रामीण साहित्यिक प्राचार्य लक्ष्मण वाळुंज सर, संकेत मीडियाचे संचालक  तुळशीदास शिंदे इ. मान्यवर हजर होते. मंडळाचे अध्यक्ष श्री.विठ्ठलनाना वाळुंज पाटील यांनी मंडळ पर्यावरण , गडकिल्ले संवर्धन , प्लास्टिक मुक्ती, इंद्रायणी नदी साफसफाई,वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन विषयी करत असलेल्या विविध उपक्रमांची माहीती दिली.

नंतर भोसरीचे प्रथम आमदार  विलासशेठ लांडे ,  विलास मडेगीरी यांच्या हस्ते महाराजांचा सन्मान करण्यात आला. नंतर तीन भाग्यवान विजेत्यांना श्रीमदभगवदगीता, ज्ञानेश्वरी व गाथा हे ग्रंथ मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. नंतर मंडळाच्या वतीने मान्यवारांचा वृक्षांची रोपे देऊन सत्कार करण्यात आला. संतनगरमधील श्री ज्ञानाई महिला भजनी मंडळ व सेक्टर-4 संतनगर स्वामी समर्थ ग्रुपचेही खुप सहकार्य लाभले.या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने हजर होते परिसरातील विविध उद्योजक,व्यापारी, अध्यात्म क्षेत्रातील नागरिक,

ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ, खडकवाडी (लोणी) हभप ज्ञानेश्वर माऊली पोखरकर, गायक हभप नितीन महाराज सुक्रे आणि हभप शुभम महाराज घेवर,हभप संतु सुक्रे,मृदुंगमणी हभप अजित महाराज वाळुंज. सुक्रे, हभप नाथा सुक्रे,हभप जयवंत पोखरकर,हभप विठ्ठल सुक्रे,हभप कैलास पोखरकर,हभप साहेबराव सुक्रे, चोपदार हभप शंकरमहाराज वाळुंज ,हभप तबाजी सुक्रे, हार्मोनियमवादक हभप पांडुरंग सुक्रे,हभप सतिशमहाराज वाळुंज. आणि विशेष अशी  संतोष डोके यांची ध्वनीक्षेपक व आचारी एकनाथ सुक्रे यांच्याकडून व्यवस्था करण्यात आली.

तसेच अन्य सहकारी,भूगोल फाउंडेशन आणि इंद्रायणी सेवा संघाचे कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी आणि वृक्षारोपणासाठी कार्यरत असणारे असंख्य नागरिक हजर होते. जेष्ठ नागरिक आणि महिलांचा,मुलांचा सहभाग उल्लेखनीय होता. कार्यक्म यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले त्यामध्ये अनिल जगताप, उमाकांत पवार, नवनाथ कोलते,अरुण इंगळे, मारूती गायकवाड ,पांडुरंग वाळुंज,राजेश किबिले, विठ्ठल मिसाळ,शिवानंद मगदुम,भारत सरडे,मच्छिंद्र बुर्डे,अजय म्हस्के,यादवराव जाधव, हर्षद राठोड,

कर्नल तानाजी अरबुज, संतोष पवार बंधु, राजेंद्र शेळके माऊली,नेताजी पाटील,  पोपट हिंगे, सिताराम वाळुंज,नंदकुमार ताकवले, जयसिंग कोहिनकर, शंकर राजगुडे, शशिकांत वाडते, साहेबराव गावडे, स्वामीभक्त एकनाथ फटांगडे, भास्कर दातीर, नेताजी पाटील, विठ्ठल वीर,चंद्रकांत थोरात, अजिंक्य पोटे, संकेत थोरात,अभिनव सागडे,ज्ञानेश आरुडे,गणेश सैंदाणे,सुरेश फरताळे, सूभाष इचके, धर्मासिंग पाटील,राजेंद्र ठाकूर, अनिल घाडगे, रामदास चपटे सर, राम देशमुख सर, भाऊसाहेब अहिरे, लोकेश निकम ,जगन्नाथ माने, संजय कांबळे, बसवराज आलुरे इ.सहकारी मंडळीनी कार्यक्रम करण्यासाठी सहकार्य केले. या वेळी कीर्तन कार्यक्रमात सहकार्य केलेल्या मान्यवरांचे आभार मानण्यात आले.नंतर सर्व भाविकांनी फराळ व महाप्रसादाचा लाभ ( Moshi ) घेतला.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.