Express Way : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी गुरुवारी दोन तास ब्लॉक

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे दरम्यान असलेल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी (Express Way) बसविण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक गुरुवारी (दि. 11) दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत घेतला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे (किलोमीटर 29/400) या ठिकाणी 2 लेग सर्विसेबल गॅन्ट्री बसविण्यात येणार आहे. यासाठी मुंबई वाहिनीवरील हलक्या व जड वाहनांची वाहतूक गुरुवारी दुपारी दीड ते साडेतीन वाजताच्या कालावधीत बंद केली जाणार आहे.

Nigdi : ब्रॉड क्रेझी स्पोर्टस क्लब कॅरम असोशिएशन तर्फे आमदार चषक स्पर्धेचे आयोजन

वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलके वाहने व बसेस ही खोपोली एक्झिट किलोमीटर 39 येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 जुना पुणे मुंबई महामार्गा वरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ होतील.

तसेच पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी व जड अवजड वाहने ही खालापूर टोल नाका येथील डाव्या बाजूकडील शेवटची लेन खालापूर एक्झिट येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 जुना पुणे मुंबई महामार्गावरून खालापूर शहरातून पुढे शेडुंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ (Express Way) होतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.