Pimpri : सावरकर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, आंबेडकरी पक्ष संघटना आक्रमक

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Pimpri) यांच्या जीवनावर आधारित अभिनेता रणदिप हुड्डा याच्या प्रमुख भूमिकेतील “सावरकर” हा चित्रपट येत्या 22 मार्च पासून प्रदर्शित केला जाणार आहे. दरम्यान चित्रपटावर आक्षेप घेत पिंपरी-चिंचवड शहरातील एकाही सिनेमागृहात शो होऊ देणार नसून चित्रपट बंद पाडू असा इशारा शहरातील आंबेडकरी पक्ष संघटनांनी दिला आहे.

सावरकर चित्रपटांतील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यक्तिरेखेत बदल व्हावा अथवा सीन कट करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. “सावरकर” या चित्रपटात महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिनयासाठी निवडलेल्या कलाकारावरून फक्त सोशल मीडियातुनच नव्हे तर देशभरातील लोकशाही तथा संविधान मानणार्‍या मोठ्या वर्गाकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

Pimpri : केरळ टीमवर महाराष्ट्र हॉकी टीमची विजयी सलामी; ऋतुजा पिसाळचे चार गोल

चित्रपटात बाबासाहेबांचा चेहरा त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे (Pimpri) फोटो उपलब्ध असून ते इंग्रजांच्याही राहणीमानाला लाजवेल असा त्यांचा पेहराव होता. चेहर्‍यावर प्रखर तेज होते. मात्र चित्रपटात ऐतिहासिक पात्र निवडताना काहीतरी साधर्म्य असायला हवे की नको? एकाला हिरो दाखवण्यासाठी महामानवाचे विकृतीकरण करण्याचा डाव सावरकर चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता व त्यांच्या संपूर्ण टीम ने आखला असल्याचा आरोप केला आहे. तात्काळ या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी. बाबासाहेबांच्या भूमिकेतील केलेले संपुर्ण चित्रिकरण कट करुन दिग्दर्शक, निर्माता, अभिनेत्यासह संबंधित संपूर्ण टीम वर भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.