Pimpri : पिंपरी चिंचवड डॅाक्टरर्स क्रिकेट प्रिमिअर लिग 2023 चे मानकरी ठरले शिवशक्ती वॅारियर्स

आर.जे.वॅारियर्स संघाने मिळविला उपविजेतेपदाचा मान

एमपीसी न्यूज- दि.28,29  व 30  एप्रिल 2023 या तीन दिवशी (Pimpri ) पिंपरी चिंचवड डॅाक्टर्स प्रिमिअर लिग या भव्य अशा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन परंदवल मैदान,देहू याठिकाणी अतिशय दिमाखदारपणे पार पडले.पिंपरी चिंचवड भागात डाॅक्टर्स क्रिकेट मध्ये प्रत्येक संघासाठी 4 लिग सामने असे या स्पर्धेचे स्वरुप होते.लिग सामने पार पडल्यानंतर गुणतालिकेतील अव्वल सहा संघ उपांत्यपूर्व फेरीकरिता पाञ ठरले.या सहा संघात तीन सामने खेळविण्यात आले यातील विजयी तीन संघांपैकी गुणतालिकेत प्रथम स्थान मिळविणारा शिवशक्ती वाॅरियर या संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

आर.जे.वाॅरियर्स व श्री चॅलेंजर्स या संघात उपांत्यफेरीतील लढत झाली व यातील विजयी आर.जे.वाॅरियर्स संघाने अंतिम फेरीत धडक मारली.अंतिम सामना शिवशक्ती वाॅरियर्स विरुद्ध आर.जे.वाॅरियर्स यांच्यातील लढत अत्यंत चुरशीची झाली.दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ असल्याने शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रोमहर्षक असा होत होता,विजयाचे पारडे दोलायमान होते कधी ते आर.जे.वाॅरियर्स तर कधी शिवशक्ती या संघाकडे झुकत होते व उत्कंठावर्धक अशा या सामन्यात शेवटच्या चेंडूवर PDPL-2023 प्रथम पर्वाच्या चषकावर डाॅ.आकाश ठुबे यांच्या मालकीच्या शिवशक्ती वाॅरियर्स यासंघाने विजेतेपदाचे आपले नाव कोरले तर डाॅ.रमेश केदार व डाॅ.जयपाल गोरडे यांच्या मालकीच्या आर.जे वाॅरियर्स या संघाने उपविजेता संघ म्हणून मान मिळविला.

 

डाॅ.कृष्णकांत मानकर व डाॅ.विशाल कुरकुटे यांच्या मालकीचा असलेल्या श्री चॅलेंजर्स हा संघ स्पर्धेतील तृतीय मानांकित संघ ठरला.
13 चेंडूत 52 धावांची निर्णायक खेळी करणारा डाॅ.अभिजित जगदाळे अंतिम सामन्याचा मानकरी ठरला. या स्पर्धेत आपल्या तडाखेबाज फलंदाजीने व गोलंदाजीची किमया करत एकहाती सामना फिरवून सर्वांची मने जिंकणारा डाॅ.प्रताप सोमवंशी यास या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले.संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजीचे कौशल्य दाखविणारा डाॅ.हितेश कर्नावट यास स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून घोषित केले तर फलंदाजांकरिता नंदनवन असलेल्या खेळपट्टीवर आपल्या सुरेख व कौशल्यपूर्ण अशा गोलंदाजीच्या जोरावर डाॅ.नितीन देवकर यांना या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले.

 

Dehugaon : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या ‘सृजनदीप’ अंकाचे प्रकाशन

आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाही लाजवेल अशा क्षेञरक्षणाने मैदानावरील खेळाडू व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले अशा डाॅ.अगस्ती गवासने यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब देण्यात आला.या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाकरिता डाॅ.अभय सद्रे (नेफ्राॅलाॅजिस्ट),डाॅ.रोहन काटे( मेडिसिन),डाॅ.गौतम जुगल(कार्डियाॅलाॅजिस्ट),डाॅ.समीर देशमुख (रेडियाॅलाॅजिस्ट),डाॅ.प्रकाश धोंगडे(गायनॅकॉलॉजिस्ट),डाॅ.सचिन वाघ(अनेस्थेशिया) हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून लाभले.

दिमाखदारपणे पार पडलेल्या या स्पर्धेचे नियोजनाची जबाबदारी डाॅ.विवेक बोंडे,डाॅ.प्रमोद कुबडे,डाॅ.निलेश पाटील, डाॅ.प्रताप सोमवंशी,डाॅ.संदीप सांडभोर,डाॅ.निलेश लोंढे,डाॅ.अमृत पेरणे,डाॅ.विशाल कुरकुटे,डाॅ.भूषण जगताप,डाॅ.अक्षय शिंगणे,डाॅ.रोहन साळुंके,डाॅ.सुनील भोये,डाॅ.संदीप नरवडे,डाॅ.केवल देशपांडे,डाॅ.दिपक चौधरी,डाॅ.विनोद देशमाने (Pimpri ) व डाॅ.महेश भोर यांनी पार पाडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.