Pimpri News : कामगार दिनानिमित  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार 

एमपीसी न्यूज़- रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या(Pimpri News ) वतीने 1 मे महाराष्ट्र दिन व  कामगार दिन  साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिन  व कामगार दिन निमित्तानेछत्रपती शिवाजी महाराज यांच्या एच.ए येथील पुतळ्याला व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील पुतळ्याला रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचेसंस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे , पोलीस उपनिरीक्षक गुळीग, निलेश पवार ,  सुरक्षा रक्षक सिद्धी कुंभार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

Pimpri : पिंपरी चिंचवड डॅाक्टरर्स क्रिकेट प्रिमिअर लिग 2023 चे मानकरी ठरले शिवशक्ती वॅारियर्स

तसेच  पिंपरी चिंचवड शहरातील सफाई कर्मचाऱ्यांचा कामगार दिनानिमित्त त्यांना गुलाबपुष्प देऊन सत्कार व  मिठाई वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.

यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहर आज स्वच्छ व सुंदर शहर म्हणूनओळखले जाते ते केवळ या सफाई कर्मचाऱ्यांमुळे.यांच्यामुळे अनेक वेळा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला व शहराला स्वच्छतेच्या बाबतीत (Pimpri News ) पुरस्कार मिळाले आहे.याकरिता आपण सफाईकर्मचाऱ्यांच्या बाबतीत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.