Talegaon Dabhade : बैलगाडा शर्यतीची ग्रामीण संस्कृती आणि परंपरा जपा अन् पुढे न्या -अजित पवार

एमपीसी न्यूज – बैल आणि शेतकऱ्यांचे जवळचे नाते (Talegaon Dabhade) सर्वश्रुत आहे.आज यांत्रिकीकरणामुळे जरी ट्रॅक्टर आणि यंत्राने शेती करत असलो तरी बैलपोळ्याचा सण शेतकरी उत्साहात साजरा करतो. बैलगाडा शर्यतीची ग्रामीण संस्कृती आणि परंपरा जपून पुढे नेण्याचे काम करण्याचे आवाहन महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बैलगाडा शौकिनांना केले.
पीएमआरडीएचे सदस्य,माजी नगरसेवक संतोष छबुराव भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी (ता.30) नाणोली तर्फे चाकण (ता.मावळ) येथील हिंदकेसरी घाटात भव्य निमंत्रित ‘पुणे जिल्हा केसरी’20~20बैलगाडा शर्यत पार पडली. यावेळी अजित पवार बोलत  होते
आमदार सुनील शेळके,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील,पुणे पीपल्स बँकेचे संचालक, सहकार भूषण बबनराव भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,जिल्हा परिषद माजी कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर, पीएमआरडीएचे सदस्य संतोष भेगडे आणि मान्यवर याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

आगमनावेळी बैलगाडा घाटातून अजित पवार यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.फेटा बांधून,पुष्पगुच्छ आणि बैलगाडा शर्यतीचे शिल्प भेट देत बैलगाडा शर्यत आयोजकांतर्फे पवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना अजित पवार पुढे म्हणाले कि, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या बैलगाडा शर्यतीवर न्यायालयाने बंदी घातल्यानंतर शेतकऱ्यांसह बैलगाडा शौकिनांच्या चेहऱ्यावर नाराजी होती.त्यानंतर केंद्र आणि राज्य पातळीवर प्रयत्न करून बंदी उठवल्यानंतर बैलगाडा शौकिनांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहायला लागला.बैल आणि शेतकऱ्यांचे जवळचे नाते सर्वश्रुत आहे.आज यांत्रिकीकरणामुळे जरी ट्रॅक्टर आणि यंत्राने शेती करत असलो तरी बैलपोळ्याचा सण शेतकरी उत्साहात साजरा करतो.याप्रसंगी बोलताना पवार यांनी कुठलेही राजकीय भाष्य करण्याची टाळले.
स्वागत आणि प्रास्ताविक आयोजक संतोष भेगडे यांनी केले.सुत्रसंचलन अतुल राऊत (Talegaon Dabhade) यांनी केले.राहुल पारगे,शरद भोंगाडे,सचिन घोटकुले, सुनिल दाभाडे, दत्तात्रय पडवळ आणि सहका-यांनी नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.