Pimpri :  ‘ती’ गावे पिंपरी-चिंचवड कार्यालयाशी जोडण्यास राज्य सरकार सकारात्मक

एमपीसी न्यूज – भूमी अभिलेख कार्यालयातील कामांसाठी पिंपरी-चिंचवडकरांची हवेली कार्यालयात (Pimpri) होणारी पायपीट थांबणार आहे. महापालिका हद्दीतील गावांचा समावेश आता हवेली कार्यालयाऐवजी पिंपरी-चिंचवड भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत होण्याच्या हालचाली सुरू आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नुकतीच त्या बाबत सकारात्मकता दर्शवली आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी या बाबत पाठपुरावा सुरू केला असून त्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याची सुचना मंत्री विखे-पाटील यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मंत्रालय येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची आमदार महेश लांडगे यांनी भेट घेतली. यावेळी भूमी अभिलेखच्या मागण्यांबाबत आमदार लांडगे यांनी निवेदन दिले.

Hadapsar : 40 हजार रुपयांसाठी मित्राच्या पत्नीवर बलात्कार; पुण्यातील घटनेने खळबळ

भूमी अभिलेख कार्यालयातून शेत जमिनीची मोजणी, जमिनीचे नकाशे, भू-संपादनाची मोजणी, न्यायालयातून आलेल्या प्रकरणाचे निर्गतीकरण करणे, न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीच्या मोजणी, खरेदी विक्री, वारसा वाटणी नोंदी आदींसह त्या संदर्भातील दाखले, नमुने देण्याचे काम केले जाते. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील काही गावांचा समावेश हवेली भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत येत होता.

त्यामुळे नागरिकांना पुणे येथील कार्यालयात आपल्या कामांसाठी जावे लागते. या ठिकाणी काम न झाल्यास पुन्हा जावे लागत होते. यामुळे वेळ व पैसा खर्च होत होता. मात्र आता नागरिकांची ही गैरसोय टळणार आहे.

पूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील काही गावांचा हवेली तहसील कार्यालय अंतर्गत समावेश (Pimpri) होता. मागील काही कालावधीमध्ये सदर गावे पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयाअंतर्गत संलग्नीत करण्यात आलेली आहेत.

Pimple Guruv : विवाहितेला लग्नाचा तगादा लावून तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

त्यामुळे तहसीलशी संबंधीत कामांची होणारी नागरिकांची गैरसोय टळली आहे. त्याच धर्तीवर भूमी अभिलेख हवेली कार्यालयातील काही गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आहेत.

ही गावे भूमी अभिलेख कार्यालय पिंपरी- चिंचवड या कार्यालयाशी संलग्नील करण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली. त्यामुळे नागरिकांना जमीन मोजणीकरिता तसेच प्रॉपर्टी कार्डच्या या कामासाठी हवेली भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जाण्याची भौगोलिक दृष्ट्या गैरसोय टळेल, अशी भूमिका आमदार लांडगे यांनी मांडली.

याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून  त्या बाबतचा प्रस्ताव त्वरीत (Pimpri) सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.

तसेच बोपखेल, दिघी, वडमुखवाडी, च-होली, चोवीसावाडी, डूडूळगाव, मोशी, चिखली, देहू, किन्हई, रावेत, मामुर्डी, किवळे आदी गावे नगर भूमापन अभिलेख पिंपरी-चिंचवड कार्यालयाशी संलग्नीत करावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 30 लाखाच्या घरात आहे. पूर्वी हवेली भूमी अभिलेख कार्यालयाचे क्षेत्र लोकसंख्या कमी असल्याने सोयीचे होते. मात्र आता पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना भूमी अभिलेख संदर्भातील कामांसाठी पुण्यात जावे लागते.

ही गैरसोय टाळण्यासाठी महसूलमंत्र्यांकडे पिंपरी-चिंचवडशी संबंधित गावे जोडण्याची मागणी केली. लवकरच या बाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा असल्याचे आमदार लांडगे (Pimpri) म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.