Pimple Guruv : विवाहितेला लग्नाचा तगादा लावून तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विवाहितेला लग्नाचा तगादा लावत तिचा पाठलाग केल्याप्रकरणी (Pimple Guruv) तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2018 पासून मार्च 2023 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला आहे.

Pimpri : पोलीस ठाण्यांमधील अडगळीतील वाहनांमुळे डेंग्यू, मलेरियाचा धोका

तरुणाच्या त्रासाला कंटाळून पीडितेने सांगवी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.26) दिली. यावरून अक्षय अंकुश निरगुडे (वय 29 रा.पिंपळे गुरुव) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या विवाहित आहेत हे माहिती असून देखील आरोपीने फिर्यादीकडे लग्नाचा तगादा लावला होता. तू माझ्याशी लग्न केले नाही तर तुझ्या आई व आजोबाला काहीतरी करेन अशी धमकी दिली. तो फिर्यादीला फोनवरून त्रास देत होता.

गर्भवती असताना देखील फिर्यादी चा पाठलाग करत विनयभंग केला. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला (Pimple Guruv) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.