Pimple Guruv: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यसाय केल्या प्रकरणी  एकाला अटक, दोन पिडीतांची सुटका

एमपीसी न्यूज- स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केल्या प्रकरणी  पिंपळे गुरव येथे स्पा सेटरवर छापा टाकून(Pimple Guruv) पोलिसांनी दोन पिडितांची सुटका केली आहे.ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने NEW OM SPA सेंटर येथे गुरुवारी (दि.11) केली आहे.
संदिप संतोष तिवारी (वय 22 रा. पिंपळे सौदागर) याला अटक केली असून त्याचा साथीदार (Pimple Guruv)आकाश साळवे याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी पोलीस हवालदार मारुती करचुंडे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी संगनमत करून स्पा सेटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून  एकावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत दोन पीडितांची पोलिसांनी सुटका केली आहे. यावेळी 18 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

https://www.youtube.com/watch?v=NFtTw2DPu6I&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.