Khed: 8 लाखाच्या  मालाचा अपहार  केल्याप्रकरणी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कंपनीचे पेनिट्रेटिंग ऑईल 60 चा माल योग्य जागी न पोहचवता(Khed) त्यांचा अपहार करत 8 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 1 ते 3 एप्रिल या कालावधीत जेएनपीटी पोर्ट मुंबई ते निघोजे खेड या मार्गावर घडला आहे.
याप्रकरणी दिनेश मोहनलाल नावानी (वय 32 रा. पिंपळे सौदागर) यांनी महाळुंगे एमआयडीसी (Khed)पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अश्लेषा कंटेनर मुव्हर्स अन्ड लेबर कॉन्ट्रॅक्टरचे मालक  अक्षय आहेर  (रा. नवी मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

Nigdi : भुयारी मार्गात दारुच्या बाटल्या, सुरक्षारक्षक नियुक्त करण्याची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीच्या कंपनीला कंटेनरमधून  कंपनीचे पेनिट्रेटिंग ऑईल 60 मध्ये लोड करून मुंबई येथून  तळेगाव दाभाडे येथे पोहचविण्यास सांगितले. मात्र माल योग्य ठिकाणी न पोहचवता अपहार करत फिर्यादीची 8 लाख 8 हजार 768 रुपयांची फसवणूक केली आहे.यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

https://www.youtube.com/watch?v=NFtTw2DPu6I&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.