Hadapsar : 40 हजार रुपयांसाठी मित्राच्या पत्नीवर बलात्कार; पुण्यातील घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज – पुण्याच्या हडपसर परिसरातून एक धक्कादायक (Hadapsar ) घटना उघडली झाली आहे. मित्राने उसने घेतलेले चाळीस हजार रुपये परत न केल्याने एकाने त्याच्या पत्नीवरच बलात्कार केला. विशेष म्हणजे मित्राला समोर बसवत त्याच्या समोरच त्याने हे कृत्य केले. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी एका 34 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादीच्या पती दोघे मित्र होते. येरवडा परिसरात व्यवसाय करताना त्यांची ओळख झाली होती. याच ओळखीतून आरोपीने फिर्यादीच्या पतीला चाळीस हजार रुपये उसने दिले होते. दीड वर्षानंतरही हे पैसे परत न केल्याने (Hadapsar )आरोपीने फिर्यादीला आणि त्यांच्या पतीला हडपसर परिसरातील आपल्या घरात बोलावले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून त्याने पैशाच्या मोबदल्यात मित्राच्या पत्नीसोबत शरीर संबंध ठेवले.
आरोपीच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने हा संपूर्ण प्रकार त्या कॅमेरात कैद झाला. त्यानंतर पुन्हा आरोपीने फिर्यादी महिलेकडे शरीर संबंधाची मागणी केली. मात्र फिर्यादीने नकार दिला असता आरोपीने हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले आहेत. तक्रार आल्यानंतर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत (Hadapsar ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.