Pimpri : ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी दिली एनबी टेक्नॉलॉजीच्या कारखान्याला भेट

एमपीसी न्यूज – ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये “स्किल एक्सलन्स सेंटर” हा कायमस्वरूपी प्रकल्प ( Pimpri) सुरू करण्यात आला आहे. या वर्षभरात 8 वर्ग खोली प्रशिक्षण, 3 कारखान्यांना भेट आणि शिक्षक पालक कार्यशाळा नियोजित आहेत. विद्यार्थ्यांना शनिवारी (दि.19) एनबी टेक्नॉलॉजीज येथे कारखान्याच्या भेटीसाठी नेण्यात आले होते.

लायन अनिल झोपे, व्यवस्थापकीय संचालक यांनी शैक्षणिक आणि उद्योग सहकार्यावर भर दिला आणि त्यांचे स्वागत केले. लायन अशोक येवले यांनी अभियांत्रिकी संस्थेतील विविध विभागांच्या कामकाजाची माहिती दिली. विविध प्रकारचे अँगल, ट्यूब, रॉड, स्टील प्लेट्स, बार विद्यार्थ्यांनी हाताळले.

कच्च्या मालाचे मापदंड मोजण्यासाठी त्यांनी फूट रुल, मीटर टेप, व्हर्नियर, मायक्रोमीटर वापरले. NBTech अधिकाऱ्यांनी कटिंग, ड्रिलिंग, मिलिंग, वेल्डिंग, प्रोफाइल कटिंग, पेंटिंग यांसारख्या ऑपरेशन्सचे प्रात्यक्षिक दाखवले. विद्यार्थ्यांनी लायन झोपे यांना व्यवसायाच्या संधी, आव्हाने, टिकाव, कामाचे वातावरण इत्यादी विविध प्रश्न विचारले. लायन झोपे यांनी त्यांच्या ( Pimpri) उत्तरांद्वारे प्रेरणा दिली.

Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये कोयत्याचा धाक दाखवून भर रस्त्यात तरुणाला लुबाडले

LCP निगडीच्या अध्यक्षा लायन मीनांजली मोहिते, शाळेच्या संचालक लायन स्वप्नाली धोका, मुख्याध्यापक विद्युत सहारे प्रेरणा संस्थापक लायन उषा येवले, शिक्षकांचा संघ, लायन जयश्री मांडे, लायन सीमा बांदेकर, लायन मारुती मुसमाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी लायन झोपे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले.

लायन उषा येवले यांनी विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप केले. कारखान्याच्या भेटीसाठी 7 वी ते 9 वीचे विद्यार्थी तसेच मुख्याध्यापिका विद्युत सहारे मॅडम, मधुरा लोटणकर, स्वप्ना अगवेकर, सौ सीमा देसाई, ईशावी आदी उपस्थित होते.

व्यसनमुक्तीवर विद्यार्थ्यांकडून जनजागृती नाटीका

सतर्कतेचा संदेश देणारे नाटक ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शनिवारी (दि.19) रोजी स्पाईन रोड मोशी येथील पुलाखाली सादरीकरण केले.

यामध्ये बिडी गुटखा तंबाखूच्या व्यसनाने कोणते दुष्परिणाम रोग होतात. यामुळे कुटुंबातील सदस्यांना कशाप्रकारे सामोरे जावे लागते याचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले . तसेच भारताला खरे स्वातंत्र्य नशामुक्तीद्वारे मिळेल याविषयी देखील जनजागृती करण्यात आली.

यादरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी या नाटकाचा लाभ घेतला व कौतुकाची दाद दिली. यामध्ये 6 वी ते 9 चे विद्यार्थी तसेच मुख्याध्यापिका विद्युत सहारे मॅडम व शाळेच्या ( Pimpri)  शिक्षिका उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.