Pashan : श्वानाच्या अंगावर घातला जेसीबी ; पाषाणमधील क्रूर घटना

एमपीसी न्यूज – सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला बसलेल्या एका श्वानाच्या अंगावर जेसीबी ( Pashan)  घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाषाण येथील संत तुकाराम कार्यालयाजवळ 19 ऑगस्ट च्या सायंकाळी हा प्रकार घडला. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी जेसीबी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एम एच 14 सीजी 9509 या क्रमांकाच्या जेसीबी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजना मिश्रा (वय 52) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सुस पाषाण रस्त्यावरील संत तुकाराम मंगल कार्यालयाजवळ रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. 19 ऑगस्ट च्या सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या परिसरातील रस्त्याच्या बाजूला बसलेल्या एका श्वानाच्या अंगावर जेसीबी चालकाने जेसीबी घातला. जेसीबीचे चाक या श्वानाच्या अंगावर गेल्याने श्वान जबर जखमी झाला असून विकलांग झाला आहे. चतुर्श्रुंगी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला ( Pashan) असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.