Pune : कोरेगाव पार्कमध्ये जर्मन बेकरीजवळ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – कोरेगाव पार्क येथील पेट्रोल पंप जंक्शन ते जर्मन बेकरी यादरम्यान पायी चालत जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील (Pune)  मंगळसूत्र हिसकावले. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. एका 41 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या कोरेगाव पार्क परिसरातील नॉर्थ मेन रोडवरील पेट्रोल पंप जंक्शन ते जर्मन बेकरी या दरम्यान पायी चालत जात होत्या.. यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील 70 हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून दुचाकीने पळून गेले. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास (Pune) सुरू आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.