Maharashtra News : मृद व जलसंधारण विभागांतर्गत 670 पदांची होणार भरती

एमपीसी न्यूज – मृद व जलसंधारण विभागांतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर ( Maharashtra News ) यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-‘ब’ (अराजपत्रित) या संवर्गातील 670 पदांची भरती प्रक्रिया 

राबविण्यात येत  असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.

Pune : कोरेगाव पार्कमध्ये जर्मन बेकरीजवळ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

मंत्री राठोड म्हणाले की, शासन अधिसूचनेनुसार जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) या पदांचे सेवाप्रवेश नियम अधिसूचित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद हे या भरती प्रक्रियेचे नियुक्ती प्राधिकारी आहेत. या अनुषंगाने आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निवड समितीची स्थापना करण्यात आली आहे. या पद भरतीकरीता टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस या कंपनीसोबत करार देखील करण्यात आला आहे.

या परीक्षेसाठी अभ्यासक्रमास तत्काळ मान्यता देऊन परीक्षेसाठी वेळ निश्चित करुन पद भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी एकूण 200 गुणांची परीक्षा असून यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी (पदविकास्तर), मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमापन चाचणी या विषयांचा अंतर्भाव असणार आहे, असेही मंत्री राठोड यांनी ( Maharashtra News ) सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.