Pune : हॉकी स्पर्धेत मुलांच्या गटात लॉयला तर मुलींच्या गटात सेंट जोसेफचे एकतर्फी विजेतेपद

एमपीसी न्यूज : लॉयला हायस्कूल आणि सेंट जोसेफ, पाषाण यांनी एकतर्फी विजय मिळविला आणि फादर शॉक (Pune) स्मृती आंतरशालेय हॉकी स्पर्धेतील (2023) अनुक्रमे 17 वर्षांखालील मुले आणि मुलींच्या विजेतेपदांवर आपले नाव कोरले. ही स्पर्धा नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली होती.

मुलांच्या अंतिम फेरीत लॉयला हायस्कूलने सेंट पॅट्रिक्स हायस्कूलचा 5-0असा धुव्वा उडविला. त्यावेळी त्यांच्याकडून आनंद शिंदे याने सहाव्या मिनिटाला गोल करीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर अयान पागेदार (19 वे, 49 वे) आणि अनय ठकार (32वे) आणि हर्ष खुणे (48वे) यांनी गोल करीत संघाला मोठा विजय मिळवून दिला. सेंट पॅट्रिक हायस्कूलला संपूर्ण सामन्यात प्रभाव दाखविता आला नाही.

मुलांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या प्ले-ऑफमध्ये ज्योती इंग्लिश स्कूलने कर्नल भगत, हायस्कूलचा पेनल्टी शूटआउटद्वारा २-१ असा पराभव केला. पूर्ण वेळेत गोल शून्य बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूटआउट चा उपयोग करण्यात आला. विजेत्या संघाकडून कार्तिक धोत्रे आणि सूरज गौतम यांनी गोल केले तर पराभूत संघाकडून मुझफ्फर कुरेशीने गोल केला.

ज्योती इंग्लिश स्कूलसाठी हुसैन कलमाडी, आदित्य गाढवे, प्रज्वल तुपलांडे यांनी आपापल्या संधी वाया घालवल्या, तर कर्नल भगत हायस्कूलसाठी अयान शाह, हुमैर शेख, एशान परदेशी आणि प्रेम घेलोत यांनी संधी गमावल्या.

मुलींच्या 17 वर्षांखालील विभागाचा प्रथमच या स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. या विभागातील अंतिम फेरीत सेंट जोसेफ संघाने सेंट पॅट्रिक हायस्कूलचा 4-0 असा दणदणीत पराभव केला. त्याचे श्रेय अन्वी रावत (15वे, 34वे, 57 वे) हिला जाते. तराशा सुखिजा हिने 28 व्या मिनिटाला एक गोल करीत तिला चांगली साथ दिली.

लोकमान्य हायस्कूलने कर्नल भगत हायस्कूलवर 1-0 असा संघर्षपूर्ण विजय मिळवून तिसरे स्थान पटकावले. मानवी जावळे (तृतीय मिनिट) हिने पेनल्टी कॉर्नरवर महत्त्वपूर्ण गोल केला आणि संघाला विजय मिळवून दिला.

एक्स लॉयला स्टुडंट्स नेटवर्क (ईएलएएन) आणि लॉयला हायस्कूल, पुणे यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत लॉयला प्रशालेने मुलांच्या सतरा वर्षाखालील गटात तर सेंट जोसेफ यांनी मुली 17 वर्षांखालील गटात अव्वल स्थान घेतले. पीसीएमसी स्कूल (14 वर्षाखालील मुले) आणि सेंट पॅट्रिक प्रशाला (12 वर्षांखालील मुले) हे संघ चॅम्पियन म्हणून उदयास आले.

Maharashtra : अभिमानास्पद! यापुढे नौदलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा; पंतप्रधान मोदी यांची घोषणा

सविस्तर निकाल

अंतिम फेरी -17 वर्षांखालील, मुले: लॉयला हायस्कूल -5 (मध्यंतर 2-0)-(अनय शिंदे 6 वे; अयान पागेदार 19वे, 49वे; अनय (Pune) ठकार 32वे, हर्ष खुणे 48वे ) वि.वि सेंट पॅट्रिक हायस्कूल 0

तिसरे स्थान: ज्योती इंग्लिश स्कूल: 2 (कार्तिक धोत्रे, सूरज गौतम) वि.वि कर्नल भगत हायस्कूल: 1 (मुझफ्फर कुरेशी)

वैयक्तिक पुरस्कार (17 वर्षाखालील, मुले)
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक : रुद्रसेन खिलारे (लॉयला)
सर्वोत्कृष्ट बचावपटू : श्रीराम लटपटे (सेंट पॅट्रिक)
सर्वोत्कृष्ट मिडफिल्डर: ओम दांगट (लॉयला))
सर्वोत्कृष्ट फॉरवर्ड: अयान पेजदार (लॉयला))व

अंतिम फेरी-17 वर्षाखालील मुली: सेंट जोसेफ, पाषाण: 4 (अन्वी रावत 15वे, 34वे, 57वे; तराशा सुखिजा 28वे) वइ.वि सेंट पॅट्रिक हायस्कूल 0
तिसरे स्थान: लोकमान्य हायस्कूल: 1(मानवी जावळे तिसरे मिनिट) वि.वि कर्नल भगत हायस्कूल: 0

वैयक्तिक पुरस्कार (17 वर्षाखालील मुली)
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक : वैष्णवी माने (लोकमान्य टिळक प्रशाला)
सर्वोत्कृष्ट बचावपटू : गौरी निकम (सेंट पॅट्रिक एचएस)
सर्वोत्कृष्ट मिडफिल्डर: अन्वी रावत (सेंट जोसेफ, पाषाण)
सर्वोत्कृष्ट फॉरवर्ड : किमया शिंदे (सेंट जोसेफ, पाषाण)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.