BJP Pune : पुणे लोकसभा भाजप उमेदवाराबाबत उत्सुकता

एमपीसी न्यूज : माजी खासदार दिवंगत गिरीश बापट यांच्या (BJP Pune) निधनानंतर आगामी पुणे लोकसभा निवडणुकीत कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता लागली आहे. महायुतीच्या जागा वाटपात पुणे लोकसभेची जागा ही भाजपच्या वाट्याला जाणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना भाजप उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

भाजपतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांच्या नावाची चर्चा आहे. कोथरूड, पर्वती, वडगांवशेरी, पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत.

नुकत्याच झालेल्या कसबा मतदारसंघात मात्र काँग्रेसचे रविंद्र धंगेकर विजयी झाले. त्यामुळे विरोधी पक्षाचा उमेदवार विजयी होऊ शकतो, हा संदेश दिला गेला आहे.

Pimpri : स्पर्धेच्या माध्यमातून संस्कृतीचे आणि पर्यावरण विषयी जागरूकतेचे दर्शन – अतिरिक्त आयुक्त खोराटे

तर, दुसरीकडे भाजपचे सहयोगी असलेले माजी खासदार संजय नाना काकडे बऱ्याच महिन्यांपासून गायब झाले आहेत. ते (BJP Pune) 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपतर्फे इच्छुक आहेत. त्यांना मानणारे पुणे महापालिकेचे जवळपास 30 ते 35 नगरसेवक आहेत. विरोधी पक्षांनीही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आम आदमी पार्टी सुद्धा महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.