Pashan : पत्नीने जेवणात चिकन दिले नाही म्हणून रागाच्या भरात मुलीच्या डोक्यात घातली वीट

एमपीसी न्यूज –  पत्नीने जेवणात चिकन न दिल्यामुळे चिडून लहान मुलीच्या डोक्यात (Pashan) वीट मारून जखमी कल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पाषाण येथे सोमवारी (दि.27) वाकेश्वर रस्ता परिसरात घडली.

Karla : एकविरा गडावर रंगला कायस्थांचा सोहळा

या प्रकरणी महिलेचेच्या नातेवाईकांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून पोलिसांनी विकास नागनाथ राठोड (रा. वाकेश्वर रस्ता, पाषाण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, विकास राठोडला सोमवारी रात्री पत्नीने जेवण दिले. परंतु जेवणात चिकन नसल्याने चिडून त्याने लहान मुलीच्या डोक्यात वीट मारली. त्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. याबाबत चतुःशृंगी पोलीस अधिक तपास करत (Pashan) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.