Karla : एकविरा गडावर रंगला कायस्थांचा सोहळा

एमपीसी न्यूज – कार्ला येथील एकविरा गड परिसरात सीकेपी समाजाची ( Karla) वास्तू उभारण्याचा निर्धार कार्ला गडावर झालेला `एक दिवस कायस्थांचा’ सोहळ्यात करण्यात आला.

गेली काही वर्षे कार्ला येथील एकविरा गडावर `एक दिवस कायस्थांचा’ सोहळा साजरा केला जातो. यंदा मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातील चार संस्था एकत्र येवून `एक दिवस कायस्थांचा’ सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. `एक दिवस कायस्थांचा’ पहाटे देवीच्या अभिषेकापासून विविध कार्यक्रम पार पडले. त्यात प्रामुख्याने अभिषेक, काकड आरती, देवीची पालखी, होमहवन, गोंधळ, महाआरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Maharashtra : कायदेविषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘विधी विधान इंटर्नशिप’; 15 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

एकविरा मंदिर परिसरात सर्वच जमातींच्या वास्तू आहेत. सीकेपी समाजाची देवता असूनही ज्ञातीची वास्तू नसल्याने वास्तू उभारण्याचा संकल्प यावर्षी सोडण्यात आला. यासाठी जागा पाहण्याचे ठरले. तसेच पुढील वर्षीपासून `एक दिवस कायस्थांचा’ विश्वस्त संस्था तयार करुन त्या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.

यंदा प्रथमच नवीन कार्यकर्त्यांतर्फे उत्सव साजरा करण्यात आला. यावर्षी महाप्रसादासाठी स्वप्नील प्रधान यांनी योगदान दिले. तसेच उत्सवाच्या यशस्वीतेसाठी विकास देशमुख, अशोक कुळकर्णी, जयदिप कोरडे, मिलिंद मथुरे, भूषण देशपांडे, निलेश गुुप्ते, मंदार कुळकर्णी, पुष्कर गुप्ते, माणिक गडकरी, सागरिका कर्णिक, गौरी मथुरे इत्यादींनी मेहनत ( Karla)  घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.