Maharashtra : अभिमानास्पद! यापुढे नौदलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा; पंतप्रधान मोदी यांची घोषणा

एमपीसी न्यूज : आज नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून (Maharashtra ) महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी भेट देण्यात आली. आता यापुढे नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची मुद्रा असण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरून हिंदुस्थानच्या नौदल सेनेला प्रारंभ केला. याच सिंधुदुर्गात आज भारतीयांना हेवा वाटेल अशी भेट देण्यात आली आहे. 

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते तारकर्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, कोणत्याही देशासाठी समुद्री सामर्थ्य किती महत्त्वाचं आहे, हे छत्रपती शिवाजी महाराज ओळखून होते. त्यामुळे त्यांनी शक्तिशाली नौसेना बनवली. त्यांचे सगळे मावळे आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत.

Maharashtra : महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांत होणार ‘जिल्हास्तरीय मंदिर विश्‍वस्त अधिवेशन’

मागच्या वर्षी नौसेनेच्या ध्वजाला महाराजांच्या विचारांशी जोडता आलं, हे माझं भाग्य आहे. आता नौदलाच्या गणवेशावर (Maharashtra )शिवरायांची राजमुद्रा असेल. यासोबतच नौदलाच्या पदांना भारतीय पद्धतीची नावं देण्याचीही घोषणा त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.