Kudalwadi : प्रभात कल्चरल फाउंडेशनचा वार्षिक संगीत महोत्सव साजरा

एमपीसी न्यूज – प्रभात कल्चरल फाउंडेशनचा 20 वा. वार्षिक (Kudalwadi)संगीत महोत्सव चिखली, कुदळवाडी येथे माता अंजनी हनुमंत मठ याठिकाणी साजरा झाला. सुरूवातीला प्रविण पोकरणा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर सुजित गौरशेटे यांचे गायन झाले.

त्यांनी ‘राग बागेश्री’ उत्तम सादर केला.त्यानंतर वैजयंती भालेराव यांचे सुगम गायन झाले, त्यांनी ‘प्रभाची सुर है’ आणि ‘जिथे सागरा धरणी मिळते हे’ भाव गीत गाऊन रसिकांची मने जिंकली.

यानंतर पुरस्कार वितरण झाले पै. बबुमिया बँडवाले (Kudalwadi)हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार गुलामअली भालदार यांना प्रवीण पोकरणा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच, प्रभात कल्चरल फाउंडेशन युवा पुरस्कार वैजयंती भालेराव यांना तात्या सपकाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पंडित पद्माकर बुवा कुलकर्णी पुरस्कार, प्रशांत पवार यांना विकास साने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. फाउंडेशन चे हे 20 वे वर्ष आहे. कार्यक्रमाला साथ सांगत संतोष साळवी, हरिभाऊ, चंद्रशेखर पखवाज, पवन झोडगे यांनी केले.

Maharashtra : महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांत होणार ‘जिल्हास्तरीय मंदिर विश्‍वस्त अधिवेशन’

कार्यक्रमाच्या शेवटी प्रसिद्ध गायक प्रशांत पवार यांचे गायन झाले. या कार्यक्रमास विशेष सहकार्य तात्या सपकाळ, प्रवीण पोकरणा, चिखलीचे डॉ. अजय व विजय ताम्हाणे, शिवाजी जांभूळकर तसेच विकास इन्फो टेक चे विकास साने यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर बावने तसेच, आभार प्रदर्शन शगुफ्ता सय्यद यांनी आभार व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.