Maharashtra : महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांत होणार ‘जिल्हास्तरीय मंदिर विश्‍वस्त अधिवेशन’

एमपीसी न्यूज – श्री क्षेत्र ओझर येथे 2 आणि 3 डिसेंबरला आयोजित (Maharashtra) करण्यात आलेल्या द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या समारोपप्रसंगी ‘राज्यस्तरीय मंदिर महासंघा’ची घोषणा करण्यात आली. यात प्रामुख्याने राज्यातील 264 मंदिरांमध्ये वस्रसंहिता लागू करण्यात आला असून 16 जिल्ह्यांमध्ये ‘जिल्हास्तरीय मंदिर विश्‍वस्त अधिवेशन’ घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या परिषदेसाठी श्री अष्टविनायक मंदिरांचे विश्‍वस्त, महाराष्ट्रातील जोतिर्लिंग देवस्थानांचे विश्‍वस्त, संत पिठांचे प्रतिनिधी, यासह देहूचे संत तुकाराम महाराज मंदिर, पैठणचे नाथ मंदिर, गोंदवले येथील श्रीराम मंदिर, रत्नागिरी येथील गणपतीपुळे मंदिर, श्री एकवीरा देवी मंदिर, अंमळनेर येथील मंगळग्रह मंदिर, विश्‍व हिंदु परिषदेच्या मठ-मंदिराच्या प्रांत आयामाचे सहकार्यवाह जयप्रकाश खोत आणि महेश कुलकर्णी यांच्यासह राज्यभरातून 650 हून अधिक मंदिर विश्‍वस्त प्रतिनिधी उपस्थित होते.

Pune : तृतीयपंथी मतदारांच्या नोंदणीसाठी समाजकल्याण विभागामार्फत मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन

या प्रसंगी सरकारीकरण झालेली सर्व मंदिरे सरकारमुक्त करून महाराष्ट्र सरकारने भक्तांच्या स्वाधीन करावीत, मंदिरातील (Maharashtra) संपत्ती विकासकामांसाठी वापरण्यात येऊ नये, महाराष्ट्रातील पौराणिक आणि ऐतिहासिक मंदिरांना अर्थसाहाय्य करून त्यांचा जीर्णोद्धार करावा, लेण्याद्री श्री गणेश मंदिरात येणार्‍या दर्शनार्थींना केंद्रीय पुरातत्व खात्याकडून आकारला जाणारा निधी आकारण्यात येऊ नये, तीर्थक्षेत्रे, गड-किल्ले यांवरील अतिक्रमणे सरकारने तात्काळ हटवावीत, तीर्थक्षेत्रे आणि अन्य मंदिरे यांच्या परिसरात मद्य आणि मांस विक्रीला सरकारने बंदी घालावी, अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील दीपोत्सवानिमित्त राज्यातील सर्व मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा करून श्रीरामजपाचे आयोजन करण्यात यावे, असे महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आले.

या प्रसंगी महाराष्ट्र मंदिर महासंघाची राज्य कार्यकारिणीची रचना घोषित करण्यात आली. यात प्रामुख्याने महासंघाचे मार्गदर्शक मंडळ घोषित करण्यात आले असून जिल्हास्तरासह तालुकास्तरावर ‘निमंत्रक’ घोषित करण्यात आले आहेत. यापुढील काळात गावस्तरावर मंदिर महासंघाचे कार्य पोचवण्याचा निर्धार सर्वांनी केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.