Pimpri : महापालिकेची तीन मिनिटांच्या चित्रफितीसाठी पावणेसात लाखांची उधळपट्टी

एमपीसी न्यूज –  महापालिकेत प्रशासकीय राजवटीमध्ये  पैशांची उधळपट्टीची ( Pimpri ) प्रकरणे वारंवार समाेर येत आहेत. दाेन प्रकल्पाच्या तीन मिनिटांची चित्रफीत तयार करण्यासाठी पावणेसात लाख रूपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे.

Smart City : स्मार्ट सिटी राबविणार हरित सेतू उपक्रम

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माेशीत कचऱ्यापासून वीज निर्मिती (वेस्ट टू एनर्जी)  प्रकल्प, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत डुडुळगाव व बो-हाडेवाडीत प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पांची मे. पद्मश्री प्रोडक्शन प्रा.लि. यांच्याकडून थेट पद्धतीने चित्रफीत तयार करून घेतली आहे. तीन मिनिटांची ड्रोन चित्रीकरण, आवाजासह चित्रफीत तयार करण्यासाठी महापालिकेने सहा लाख 81 हजार 450 रूपये माेजले आहेत.

या दाेन प्रकल्पांची माहिती देणारी पुस्तिका मे. प्राेमिशिंग डिझाईन्स स्टुडिओ यांच्याकडून छपाई करून घेतली. या पुस्तिकेसाठी दोन लाख 36 हजार 600 रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे दाेन प्रकल्पांची चित्रफित आणि माहिती पुस्तिका तयार करण्यासाठी महापालिकेने नऊ लाख 18  हजार  रूपयांचा खर्च केला आहे. या खर्चाला महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी  ( Pimpri ) मंजुरी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.