Pimpri : महापालिकेतर्फे जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांसाठी बैठक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्यातर्फे शासकीय जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात या ठिकाणी नियोजन सभा संपन्न झाली. 
 

यावेळी, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, क्रीडा समिती सभापती संजय नेवाळे, प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, क्रीडा समिती सदस्य अनुराधा गोफणे, अश्विनी वाघमारे, कुंदन गायकवाड, स्थानिक नगरसदस्या प्रा. सोनाली गव्हाणे, क्रीडा विभागाचे प्रशासन अधिकारी राजेश जगताप, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे राजेश बागूल, श्रीकांत हरनाळे, सुभाष नावांदे, रज्जाक पानसरे आदी उपस्थित होते. 
 
एकनाथ पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिका औद्योगिकनगरी बरोबरच क्रीडानगरी म्हणून ओळखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच, क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. यावेळी, क्रीडा शिक्षकांना ऑनलाईन प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली. क्रीडा पर्यवेक्षक जयश्री साळवे यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास गेंगजे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.