Police Patrolling : शाहूनगर,संभाजीनगर,दत्तनगर विद्यानगरमध्ये पोलिसांची गस्त वाढणार

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Police Patrolling) प्रभाग क्रमांक दहा शाहूनगर ,संभाजीनगर,दत्तनगर विद्यानगर व इतर परिसरामध्ये पोलिसांची गस्त वाढविण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी माजी नगरसेविका अनुराधा गोरखे यांना दिले.

शाहूनगर, संभाजीनगर, दत्तनगर, विद्यानगर व मोरवाडी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात गळ्यातील चेन चोरणे ,घर फोडयाचे प्रकार होत आहेत. यासाठी पोलिसांची ग्रस्त वाढवावी. खासकरून शाहूनगर व संभाजीनगर मध्ये शाळा कॉलेज परिसरात हुल्लडबाजी करणारे तरुण टू व्हीलर वर जोरजोरात हॉर्न देऊन गाडी चालवितात. सायलेन्सर मधून आवाज काढतात. बाईकवर तीन तीन ,चार चार जण एकत्र बसून हुल्लड बाजी करणे, असे प्रकार वाढले असून यावर तोडगा काढण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी माजी नगरसेविका गोरखे यांनी पोलीस आयुक्त शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून केली.

Wakad burglary : वाकड येथे किचनच्या खिडकीचे ग्रील तोडून 5 लाखांची घरफोडी

त्यावेळेस त्यांच्या समवेत नंदा करे, उषा सरोदे व इतर महिला उपस्थित होत्या.(Police Patrolling) त्यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या परिसरामध्ये पोलीस गस्त लवकरच वाढवू व असे प्रकार घडू नयेत यासाठीच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित दिल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.