Pratibha institute : प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट संस्थेत ओणम व गणेश चतुर्थी साजरी

एमपीसी न्यूज : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इन्स्टिट्यूट (Pratibha institute) ऑफ बिझनेस मॅनेजमेंट संस्थेतील एम.बी.ए. व एम.सी.ए. च्या 70 विद्यार्थ्यांनी ओणम व गणेश चतुर्थी साजरी केली.

कार्यक्रमाचे उद्घाटन कमला एज्युकेशन सोसायटीच्या खजिनदार डॉ.भूपाली शहा यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आय.आय.एम.ए. संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे, डी.वाय.पाटील सेंटर ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च विभागाचे संचालक डॉ. सुनिल धनवडे उपस्थित होते.

Raid on paneer factory : कोंढवा येथील बनावट पनीर कारखान्यावर कारवाई, 22 लाखाचा मुद्देमाल जप्त

विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवित शाडू मातीने बनविलेली मूर्ती, फुलांची आकर्षक रांगोळी, ढोल-ताशा बरोबरच केरळचे पारंपारिक वाद्य भिरूवादीरा, चेंदामेलम (केरळ ड्रम बीट्स) पारंपारिक नृत्य आदी उपक्रमे स्पर्धा स्वरूपात राबवित ओणम व गणेश चतुर्थी सण एकत्रित साजरा करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश शहरवासीयांना देण्यात आला.(Pratibha institute) यावेळी विद्यार्थी व प्राध्यापकांनी पारंपारिक केरळची वेशभूषा परिधान करून वैशिष्ट्यपूर्ण नृत्याचे सादरीकरण उपस्थितांसमोर केले.

यावेळी एम.बी.ए. विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, शाखेचे विभाग प्रमुख प्रा. गुरुराज डांगरे, प्रा. मनिष पाटणकर समवेत प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे संयोजन प्रा. नीजी साजन यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.