Pune : पुण्यातून 14 लाखांचे एमडी जप्त, 61 वर्षीय इसमाला अटक

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी ( Pune ) पथकाने संगमवाडी येथे एका 61 वर्षीय इसमाकडून 14 लाख रुपयांचे एमडी (मेफेड्रोन)  हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.अलीशेर लालमहंमद सौदागर (वय 61 रा. शिवाजीनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे.

Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडी सुटणार कशी?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार नितीन जगदाळे यांना बातमीदार मार्फत खबर मिळाली की, संगमवाडी येथे एकजण अंमलीपदार्थाच्या विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संगमवाडीयेथून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कडून पोलिसांनी 70 ग्रॅम वजनाचे 14 लाख रुपयांचे एमडी जप्त केले.

तसेच गुन्ह्यात वापरलेला फोन व वजन काटा जप्त केला.त्यानुसार येरवाडा पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभांगी नरके करणार ( Pune ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.