Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडी सुटणार कशी?

एमपीसी न्यूज-आज सकाळपासून मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर(Mumbai Pune Expressway) पुन्हा मोठी वाहतूककोंडी झाली आहे. आज साधारण 45 मिनिटे वाहतूक थांबली होती.वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवास करणारे नागरिक त्रस्त झाले होते .ही वाहतूक कोंडी अलिकडे  वारंवार पहायला मिळत आहे.

पोलिस ही कोंडी सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत आहेत.परंतू  वाहनांची संख्या जास्त असल्याने हे वारंवार घडत आहे.मे महीन्याच्या सुट्ट्या आल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने खाजगी वाहनांमधून पर्यटनासाठी घराबाहेर पडत आहेत.

Pune : डिलिव्हरी बॉयने कंपनीची केली लाखो रुपयांची फसवणूक

पर्यटनासाठी तसेच प्रवासासाठी अलीकडे सार्वजनिक वाहतूक करणार्‍या वाहनांचा वापर फारच कमी झाला आहे.प्रत्येकजण स्वत:च्या खाजगी वाहनांचा वापर करत आहे.त्यामुळे ही समस्या वारंवार उद्भवत आहे.

यासाठी नागरिकांनीही योग्य ती काळजी घेतली पाहिजे. खाजगी वाहनांचा वापर कमी करत सार्वजनिक वाहतुकीचा वापर  करण्याकडे जास्त कल दिला पाहिजे.  तसेच शासनाने ही या वाहतुकीच्या कोंडीच्या समस्येवर ठोस असे काहीतरी (Mumbai Pune Expressway) उपाययोजना करणे गरजेचे आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.