Pune: मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर टोलच्या नावाखाली खुलेआम लूट : विवेक वेलणकर

एमपीसी न्यूज – मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर टोलच्या (Pune)नावाखाली खुलेआम लूट सुरू असल्याचा आरोप सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. 
17800कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या अटल सेतू (Pune)वरील टोल 2000 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गापेक्षा निम्मा आहे. १७८०० कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या अटल सेतूचं  पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि तो वाहतुकीसाठी खुला झाला. या रस्त्यावर कारसाठी जाऊन येऊन टोल ३७५ रुपये आहे.

मात्र 24 वर्षांपूर्वी 2000कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या व आजवर दहा हजार कोटी रुपयांहून अधिक टोल वसुली झालेल्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आजही कारसाठी जाऊन येऊन टोल 640रुपये आहे. आणि 2030 पर्यंत ही वसुली सुरूच राहणार आहे.
आधुनिक काळातील हे आठवं आश्चर्य मानावं, की या खुले आम चाललेल्या लुटीबद्दल संताप व्यक्त करावा, हे कोडं उलगडत नाही, असेही वेलणकर यांनी सांगितले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.