Bhosari: भोसरीत शुक्रवारी हभप. निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन

सार्वजनिक दुर्गाष्टमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज – श्री साई चौक मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक (Bhosari)दुर्गाष्टमी उत्सवाच्या 18 व्या पर्वानिमित्त भोसरीतील इंद्रायणीनगर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

यामध्ये शुक्रवार दि. 19 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी साडेसात वाजता (Bhosari)महाराष्ट्र भूषण समाज प्रबोधनकार हभप. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे किर्तन होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपा शहर सरचिटणीस विलासभाऊ मडिगेरी यांनी दिली.

इंद्रायणीनगर चौक येथील वैष्णा माता मंदिराच्या प्रांगणात शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता हे किर्तन होणार आहे. किर्तन सोहळ्यापूर्वी गुरुवार दि. 18 जानेवारी 2024 रोजी सकाळी नऊ ते बारा वाजता दरम्यान मंदिरात दुग्धाभिषेक, होमहवव व आरती होणार आहे. नंतर दुपारी बारा ते साडेसहा या कालावधीत महाप्रसाद वाटप, दुपारी दोन ते चार वाजता महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ पार पडणार आहे.

Pimpri :  वाकड- दत्तमंदिर रस्ता 45 मीटर रुंदीकरणासाठी जागा ताब्यात घेणार- आयुक्त शेखर सिंह 

तर, दुपारी भजन समारंभ पार पडणार असून यामध्ये संजीवनी महिला भजनी मंडळ, स्वरांजली भजनी मंडळ, इंद्रायणीनगर भजनी मंडळ भजन सादर करणार आहेत.

या उपक्रमासाठी आमदार महेश लांडगे, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप आमदार आश्विनी जगताप, आमदार उमा खापरे आणि यांच्यासह पिंपरी-चिंचवड व परिसरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सर्वांनी सहभागी व्हावे, तसेच शुक्रवारी होत असलेल्या हभप. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या किर्तन सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष विलासभाऊ मडिगेरी व कार्याध्यक्ष विलास भांबुर्डेकर यांनी केले आहे.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.