Pune:डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतली महादेव बाबर यांची भेट

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर( Pune)खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना नेते आणि माजी आमदार माहादेव बाबर यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. कोल्हे यांचा पराभव करणार म्हणजे करणारच अशी खूणगाठ बांधल्यानंतर बाबर यांची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. 

 

माझे मार्गदर्शक, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा माजी आमदार महादेव बाबर यांची भेट झाली. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांचा अनुभव, संघटन कौशल्य नेहमीच माझ्यासाठी मार्गदर्शक असतं. “महाविकास आघाडी” म्हणून सोबत प्रत्यक्ष काम करताना त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते, असे डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे.

Bhosari: भोसरीत शुक्रवारी हभप. निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन

दरम्यान, अजित पवार यांनी दिलेल्या आवाहनानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात (Pune)अमोल कोल्हे यांनी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. जागावाटपात शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला (शिंदे गट) सोडण्याची मागणी करण्यात येत आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मागील काही महिन्यांपासून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिरूरसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आग्रही आहे. लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिनेच शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.