TDR : मी PCMC चा चौकीदार ,रद्द करणार हा TDR – अमोल थोरात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील टीडीआर घोटाळा रोखला (TDR )जाईल. मी महापालिकेचा चौकीदार असून हा घोटाळा रोखणार असल्याचे भाजपचे माजी संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 1500 कोटींचा टीडीआर घोटाळा समोर (TDR )आला आहे. महापालिका हद्दीत वाकड येथे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला लागून सर्व्हे क्रमांक 122 मध्ये क्रमांक 4/38 या जागेत पीएमपीएमएल डेपो व ट्रक टर्मिनल पार्किंगसाठी आरक्षण आहे.

 

या आरक्षित जागेचे एकूण क्षेत्रफळ 10 हजार 274 चौरस मीटर आहे. ही जागा टीडीआरचा मोबदला देऊन खासगी  बिल्डर यांच्याकडून महापालिकेच्या ताब्यात घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

 

Pune: मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर टोलच्या नावाखाली खुलेआम लूट : विवेक वेलणकर

त्यानंतर त्याच विलास जावडेकर इन्फिनिटी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बिल्डरला ही आरक्षणाची जागा भूखंड एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावलीनुसार विकासित करण्यास देण्याचा प्रशासकीय प्रवास सुरू झाला.

हा प्रशासकीय प्रवास 1500 कोटींचा जादाचा टीडीआर देण्यापर्यंत पोहोचला. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित बिल्डरला बांधकाम परवानगी, टीडीआरची मंजुरी, सुधारित बांधकाम परवानगीचे सोपस्कार पूर्ण करून सर्व मंजुरी तातडीने दिली.

 

टीडीआरचा दर कायद्याने ठरलेला आहे. वाकड येथील जागेचा रेडी रेकनरनुसार दर प्रति चौरस मीटर 26 हजार 620 रुपये आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेने तब्बल 65 हजार 69 रुपये प्रति चौरस मीटर दराने संबंधित बिल्डरला टीडीआर दिला.

 

या जादा दराने दिलेल्या टीडीआरमुळे बिल्डरचा तब्बल 1500 कोटीहून अधिकचा फायदा झाला. महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमताने एका बिल्डरला फायदा पोहोचवण्याच्या उद्देशाने तब्बल 1500  कोटींचा जादा टीडीआर दिल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.