Pune: नारी निर्धार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न 

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मुंबई येथे (Pune)येत्या 18 तारखेला भव्य नारी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न झाली, अशी माहिती पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक मानकर यांनी दिली. 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर (Pune)यांच्या प्रमुख उपस्थितीत या महामेळाव्याच्या नियोजना संदर्भात बैठक घेण्यात आली.

या मेळाव्याच्या अनुषंगाने विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करत मार्गदर्शन केले.
शिवाजीनगर विधानसभा महिला पदाधिकाऱ्यांना पद वाटप करण्यात आले. आगामी काळात या सर्व रणरागिणी पक्ष वाढीसाठी तसेच जनसेवेत कार्यरत राहतील असा विश्वास असल्याचे मानकर यांनी सांगितले.
यावेळी पुणे शहर महिलाध्यक्षा प्रियाताई गदादे, शिवाजीनगर विधानसभा महिला अध्यक्षा अनिता पवार यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.