Pune : विठ्ठल मंदिरात चोरी, रुक्मिणीच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरले


एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील कुडले गावातील विठ्ठल मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारास उघडकीस आला. चोरट्याने मंदिरातील रुक्मिणी मुर्तीच्या अंगावरील आणि गरूड खांबांचा काही भाग चोरून नेल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत भट यांनी दिली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, खडकवासला धरण परिसरात हे गाव आहे. आज पहाटेच्या सुमारास काही गावकरी मंदिरात गेले असता गरूड खांबावरील 32 हजार रुपये किमतीचा चांदीचा पत्रा आणि रुक्मिणीच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. चोरी झाल्याची माहिती त्यांनी पोलिसांनी घटनास्थळीधाव घेत पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.