Pimpri: नगरसेवकांच्या नावे नोटीस; नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर


एमपीसी न्यूज – आरक्षणाचा ताबा घेण्यासाठी पाठविलेल्या नोटिशीत नगरसेवकाचे नाव टाकले जाते. हा कुठला कारभार? प्रशासनाची काही जबाबदारी आहे की नाही? हे खपवून घेतले जाणार नाही, असे स्थायी समितीने प्रशासनास सुनावले. तसेच प्रशासन पळपुटे असल्याचा आरोप देखील स्थायी समितीने केला.

प्रभाग क्रमांक 29 पिंपळेगुरव येथे एक आरक्षण आहे. ते ताब्यात घेण्याची मागणी स्थानिक नगरसेविका उषा मुंढे यांनी प्रशासनाकडे केली होती. प्रशासनाने आरक्षण ताब्यात घेण्याची तयारी केली. परंतु, नागरिकांना दिलेल्या नोटिसीत नगरसेविका मुंढे यांचे नाव टाकले होतो. यावरुन मुंढे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

नगरसेवकांची नावे नोटीशीत येतातच कशी? नगरसेवकांचे एखाद्या कामाची तक्रार केली. विकासासाठी काही प्रयत्न केले तर त्यांची नावे तुम्ही देतात कशी? प्रशासन लोकांना कोणी तक्रार केली हे सांगते. ही बाब अत्यंत चुकीची आहे. नोटिशीमध्ये नगरसेवकाने तक्रार केली आहे, असा उल्लेख करणे हे कोणत्या नियमात बसते. प्रशासन चुकीच्या पद्धतीने काम करित आहे. ही बाब चुकीची आहे. नगरसेवकांच्या सूचनेवरुन कार्यवाही होते? मग प्रशासन कशाला आहे, असा सवाल सदस्यांनी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.