Pune : भारतीय विद्या भवन’ मध्ये शुक्रवारी ‘कजरा मोहब्बतवाला’ कार्यक्रम

एमपीसी न्यूज- ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’ च्या वतीने हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण काळातील महिला गायिकांनी गायलेल्या ड्युएट म्हणजे युगूलगीतांच्या ‘कजरा मोहब्बतवाला ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक प्रसार योजनेंतर्गत हा 50 वा, सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम आहे, अशी माहिती ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली.

‘भारतीय विद्या भवन’ च्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह (सेनापती बापट रस्ता) येथे शुक्रवारी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ‘सूर सखी ‘संस्थेद्वारे हा कार्यक्रम सादर होणार आहे. ‘गाणी दोघींची-आवड सगळ्यांची’ अशी या कार्यक्रमामागची मध्यवर्ती कल्पना आहे.

कार्यक्रमाची निर्मिती मानिनी गुर्जर यांची असून संकल्पना ,निवेदन रंजना काळे यांचे आहे . मानिनी गुर्जर, अनुराधा पटवर्धन, देवयानी सहस्रबुद्धे गीते सादर करणार आहेत. संपदा देशपांडे, उमा जठार, किमया काणे, उर्मिला भालेराव, भावना टिकले, शिल्पा आपटे साथसंगत करणार आहेत . या कार्यक्रमात अनेक संगीतकारांच्या रचना सादर करण्यात येणार आहेत. कार्यक्रमांतर्गत साधारण १८ गीतांचे सादरीकरण होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

<