Pune :17 व्या वसंतोत्सवाला दिमाखात सुरुवात

एमपीसी न्यूज – वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी (Pune )आयोजित करण्यात येणाऱ्या वसंतोत्सवला आजपासून कोथरूड येथील काकडे फार्मस् येथे दिमाखात सुरुवात झाली.

यंदा महोत्सवाचे हे 17 वे वर्ष असून पुढील दोन दिवस वसंतोत्सवमध्ये आता पुणेकरांना शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि फ्युजन संगीताचा आस्वाद घेता येणार आहे.

वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या बापू देशपांडे, व्यंकटेश बिल्डकॉन (Pune )च्या पियुषा असबे, भारती विद्यापीठचे सहसचिव डॉ. महादेव सगरे, पु ना गाडगीळ यांच्या रेणू अजित गाडगीळ, सूर्यकांत काकडे आणि असोसिएटस् चे जय काकडे, मॅसकॉटचे भरत कुळहल्ली यांच्या हस्ते दीपप्रज्वलन संपन्न झाले. नेहा देशपांडे, दीप्ती माटे, तेजस उपाध्ये व राजस उपाध्ये आदी उपस्थित होते.

 

आज ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांच्या गायनाने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाला सुरुवात झाली. यावेळी त्यांनी राग मधुवंती चे बहारदार सादरीकरण केले. यावेळी त्यांनी विलंबित तीन तालात ‘सांज भयी…’ ही बंदिश प्रस्तुत केली. वसंतराव देशपांडे आणि पं कुमार गंधर्व यांची ‘मैं आयुं तोरे मंदरवा…’ ही द्रुत बंदिश त्यांनी सादर केली.

Pune: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड विठ्ठल शेलारची पोलिसांनी काढली धिंड

राग मधुवंती हा खास या बंदिशीसाठी निवडला असेही त्यांनी यावेळी सांगितले. यानंतर त्यांनी राग तिलक कामोद सादर केला. यामध्ये त्यांनी वसंतराव देशपांडे यांची ‘सुर संगत’ ही रचना सादर केली. ‘राम तोरी माया नाच नचावे…’ या भजनाने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला.

त्यांना भरत कामत (तबला), डॉ चैतन्य कुंटे (संवादिनी), स्वरांगी मराठी व ऋतुजा लाड (तानपुरा) यांनी साथसंगत केली.प्रत्येक वर्षी वसंतोत्सव मध्ये उभारण्यात येणारा सेट हा आकर्षणाचा विषय असतो. याहीवर्षी आयोजकांच्या वतीने बनारस घाटाचा प्रत्यय येईल अशा भव्य सेटची रचना करण्यात आली होती.

यावर्षी महोत्सवासाठी पुनीत बालन समूह, व्यंकटेश बिल्डकॉन प्रा लि-अंकुश असबे व्हेंचर, भारती विद्यापीठ, पु ना. गाडगीळ अँड सन्स, सुहाना मसाले,लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी, गिरिकंद हॉलिडेज, खैतान अँड कंपनी, मॅस्कॉट, डॉन स्टुडीओ, एल अँड टी रियल्टी, आणि यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.