Pune: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड विठ्ठल शेलारची पोलिसांनी काढली धिंड

एमपीसी न्यूज – शरद मोहोळ हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी(Pune )कारवाई केली आहे. मोहोळ हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड विठ्ठल शेलार याची त्याच्या राहत्या घराजवळून धिंड काढन्यात आली .

गँगस्टर शरद मोहोळ खूनप्रकरणात अटक करण्यात आलेल्या गुंड विठ्ठल शेलारची पुणे पोलिसांनी “बुलेटप्रूफ” व्हाईट स्कॉर्पिओ जप्त केली.

विशेष म्हणजे, ही कार पुनावळे येथील एका फार्महाऊसवर होती. मात्र, पोलीस ती जप्त करतील या भितीने ती कार दुसरीकडे घेऊन जात असताना गुन्हे शाखेने तिचा माग काढला.

Pune: पवारांचा पत्रकारांशी संवाद;तरुणांसह नरेंद्र मोदी, रोहित पवार यांच्याविषयी भाष्य

पोलीस मागावर असल्याचे समजताच बुलेटप्रूफ कार रस्त्याच्या कडेला सोडून त्यांनी पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी ती जप्त केली. दरम्यान, शरद मोहोळ खूनप्रकरणात गुन्हे शाखेने महागड्या 6 कार जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी आतापर्यंत क्रेटा, इंनोव्हा, फॉर्च्युनरसह महागड्या एकूण 6 कार जप्त करण्यात आल्या आहेत.ण्यात आली आहे. पुनावळेमधून पोलिसांनी विठ्ठल शेलारची धिंड काढली. याशिवाय पोलिसांनी शेलारची बुलेटप्रुफ स्कॉर्पिओही जप्त केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.