Pune: पवारांचा पत्रकारांशी संवाद;तरुणांसह नरेंद्र मोदी, रोहित पवार यांच्याविषयी भाष्य

एमपीसी न्यूज – राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Pune)यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तरुणांना राजकारणामध्ये संधी देण्यासह रोहित पवार यांना ईडीची आलेली नोटीस तसेच पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरांच्या लोकार्पण सोहोळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले, याबाबत त्यांनी भाष्य केले.

मी सुरुवातीपासूनच तरुणांना संधी देत आलोय.

मी राजकारणात आलोय, तेंव्हा पासून तरुणांना संधी देत आलोय. (Pune)आत्ताच्या आमदारांमध्ये तरुण मोठ्या संख्येने आहेत. पुढंही मी तरुणांना संधी देणारचं असे प्रतिपादन अजित पवार यांनी केले .

Alandi : इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी चाललेल्या उपोषणाची जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली दखल

रोहित पवार ईडीची यांना नोटीस

रोहित पवार यांना ईडीची नोटीस आली, त्याबाबत मला माहित नाही. ईडी ही केंद्रीय यंत्रणा आहे. मागे मला ही नोटिसा आलेल्या आहेत. त्यात तथ्य असेल तर अडचणी येतात, नसेल काही तर अडचण येत नाही, असेही पवार म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले

आता तुम्ही जर आता पत्र्याच्या घरात, छोट्याश्या घरात राहिला असाल, त्यांना त्यांची त्यावेळची अवस्था आठवली असेल आणि पंतप्रधान झाल्यावर आपण अनेकांना घरं देतोय हे पाहून भावुक झाले असतील. मी पण आधी पत्र्याच्या घरात, सारवलेल्या घरात राहायचो, नंतर बंगला झाला. काळानुरूप परिस्थिती बदलत असते. आता मोदी पंतप्रधान आहेत, मात्र पूर्वीचे दिवस कोणीच विसरत नाही. ते आज त्यांना आठवलं असेल, म्हणून ते भावुक झाले असावेत.

संजय राऊत यांच्यावर टीका

पत्रकारांनी शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार यांच्या बाबत पवार यांना प्रश्न विचारला असता ” विनाश काले विपरीत बुद्धी” असा टोला त्यांनी लगावला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.