Alandi : इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी चाललेल्या उपोषणाची जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली दखल

एमपीसी न्यूज : आळंदी येथे राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र (Alandi) यांच्या वतीने दि.15 पासून इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा पाचवा दिवस सुरू आहे. महाद्वार चौकात हभप मोहनानंद महाराज ओवाळ, हभप मुबारक शेख, फारूक इनामदार, हभप दत्तात्रय साबळे यांचे हे बेमुदत उपोषण चालू आहे.

या उपोषणाची दखल जिल्हाधिकारी कार्यालयानी घेतली असून व्यंकटेश दुर्वास जिल्हा सह.आयुक्त नगरपालिका शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचे त्यासंदर्भात पत्र उपोषणकर्त्यांना मिळाले आहे.

इंद्रायणी प्रदूषणाच्या विषयाबाबत विविध मागण्यांसाठी आळंदी येथे आपणामार्फत उपोषण सुरू आहे. सदर उपोषण संदर्भात प्राप्त निवेदनात केलेल्या सर्व मागण्या रास्त असून आपल्या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली असून इंद्रायणी नदी प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत असलेल्या सर्व सांडपाण्याचा सविस्तर अभ्यास करून सर्वसमावेशक सविस्तर प्रकल्प अहवाल(DPR) बनविण्याच्या कामाबाबत व पुढील कामांच्या प्रगतीबाबत आढावा घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली गेली असून सदर बैठकीचे पत्र सोबत संलग्न केले आहे.

Nigdi : निगडीतील बैठ्या पक्क्या घरांच्या ‘एसआरए’ अंतर्गत पुनर्वसनास स्थानिक नगरसेवकांचा विरोध

तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखडा कार्यकारणी समितीची विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक दिनांक 25 जानेवारी रोजी आयोजित केली आहे. मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद यांच्या मार्फत संदर्भ क्रमांक 4 अन्वये प्राप्त अहवालानुसार, आळंदी नगरपरिषद हद्दीतील 4 MLD क्षमतेच्या STP प्रकल्पास तीर्थ क्षेत्र विकास आराखडा अंतर्गत मंजुरी प्राप्त असून सदर प्रकल्प निविदा प्रक्रिया टप्प्यावर असून 25 जानेवारी रोजीच्या कार्यकारणी समितीच्या बैठकीत STP प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबवून पुढील कार्यवाही करण्याबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे.

तसेच आपण निवेदनात इंद्रायणी नदी प्रदूषणा बाबत सुरू असलेल्या उपाययोजनांमध्ये नागरिकांना सहभागी करून घेण्याची (Alandi) आपण केलेली मागणी उपरोक्त बैठकीत मांडली जाईल. असे पत्रात नमूद केले आहे. तसेच उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली असून उपोषण स्थगित करून सहकार्य करण्याची विनंती त्यांनी त्या पत्राद्वारे केली आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पिंपरी चिंचवड, चाकण, हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील व शहरातील सांडपाण्यामुळे इंद्रायणी, पवना नदीत होणाऱ्या जलप्रदूषणावर उपाययोजना करण्याबाबतच्या विषया संदर्भात दि. 25 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारत चौथा मजला येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या वतीने उपोषण स्थळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी भेट देऊन त्या संदर्भात चर्चा केली. याबाबत माहिती उपोषणकर्त्यांनी दिली. तसेच इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी उपोषण सुरूच असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.