BJP Loksabha : शिवाजी मानकर पुणे लोकसभेसाठी भाजपतर्फे इच्छुक

एमपीसी न्यूज – माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश (BJP Loksabha) जावडेकर, आमदार माधुरी मिसाळ भाजपतर्फे पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामध्ये आणखी एकाची वाढ झाली आहे. इच्छुकांच्या यादीमध्ये भाजपकडून शिवाजी माधवराव मानकर हे देखील पुणे लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक असल्याचं त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवाजी मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहर अध्यक्ष दीपक मानकर यांचे बंधू आहेत. गेले कित्येक वर्षांपासून ते नाशिक शहरात भाजपमध्ये सक्रिय राहून काम करत होते. पण, आता त्यांनी आपले मूळ गाव असणाऱ्या पुण्याकडे मोर्चा वळवल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता भाजपमध्ये उमेदवारीसाठी चुरस वाढताना दिसत आहे. मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांनी मोठमोठे कार्यक्रम आयोजित करून जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.

Nigdi : निगडीतील बैठ्या पक्क्या घरांच्या ‘एसआरए’ अंतर्गत पुनर्वसनास स्थानिक नगरसेवकांचा विरोध

मुळीक यांनी आरोग्य शिबीर भरवून ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तर, मोहोळ यांनी अपने अपने राम या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा निवडणूक होणार आहे. मोहोळ आणि मुळीक यांनी यापूर्वीही विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.