Today’s Horoscope 20 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग-Today’s Horoscope 20 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग-

आजचा दिवस – शनिवार.

तारीख 20.01.2024.

शुभाशुभ विचार- कृतिका वर्ज्य दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी9.00ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – कृतिका.

चंद्र राशी – मेष 08.53पर्यंत नंतर वृषभ.
—————————-
मेष – ( शुभ रंग – आकाशी)
आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. गरजेपुरता पैसा सहज उपलब्ध होईल. गृहणी कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडतील. आनंदी दिवस.

वृषभ ( शुभ रंग- गुलाबी)
कार्यक्षेत्रात हितसंबंध निर्माण होतील. उपवारांना स्थळे सांगून येतील. आवडते छंद जोपासण्यासाठी पैसा व वेळ खर्च कराल. आज तुम्ही इतरांच्या भानगडीत मध्यस्थी कराल.

मिथुन – ( शुभ रंग- डाळिंबी)
खर्चाचे प्रमाण वाढले तरी पैसा कमी पडणार नाही. कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल. आज प्रवासात असाल तर मात्र आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या.

कर्क – ( शुभ रंग – हिरवा)
पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. तुमचे कष्ट कारणी लागतील. व कार्यक्षेत्रात यशाची चाहूल लागेल. दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा आहे.

सिंह -( शुभ रंग – मोरपंखी)
नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण जाणवेल. अधिकारी वर्गाला अधिकार वापरावेच लागतील. कार्यक्षेत्रात अविश्रांत श्रम करण्याची तुमची आज तयारी असेल. व्यस्त दिवस.

कन्या – ( शुभ रंग- पिस्ता)
उद्योग धंद्याच्या दृष्टीने थोडा विरोधी दिवस. नोकरीत साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. कार्यक्षेत्रात काही आकस्मिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

तूळ ( शुभ रंग- तांबडा)
फक्त आपल्याच भल्याचा विचार करा. आज भावनेच्या भरात कुणालाही वचने देऊ नका. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आज दिवस योग्य नाही. गाडी हळू चालवा.

वृश्चिक ( शुभ रंग – राखाडी)
आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असणार आहे. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हौस मौज करताना कायद्याचे भान ठेवा. सतर्क रहा.

धनु (शुभ रंग- सोनेरी)
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीत नियमांचे उल्लंघन करू नका. हाताखालच्या लोकांवर वचक गरजेचा आहे.

मकर- ( शुभ रंग – निळा)
आज तुमचा चैन करण्याकडे कल राहील. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेले व्यवसाय आज चांगले चालतील. कलावंतांना उत्तम संधी चालून येतील.

कुंभ – (शुभ रंग- जांभळा)
स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.

मीन ( शुभ रंग- पांढरा)
आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे. रिकामटेकडी चर्चा वादास कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल. घराबाहेर वाद संभवतात.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.