Pune : छत्तीसगडमधून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात दोन एनजीओ कर्मचाऱ्यांना अटक 

एमपीसी न्यूज – आपल्या प्रियकरासोबत पुण्यात पळून (Pune) आलेल्या छत्तीसगड येथील अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचाऱ्याने साथीदारसह बलात्कार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली . या प्रकरणी कमलेश तिवारी (मूळ रा. उत्तर प्रदेश ) असे अटक करण्यात आलेल्याचे एका आरोपीचे नाव आहे तर आरोपी हवालदार अनिल पवार हा फरार आहे. आज या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) सिद्धार्थ मल्टीपर्पज सोसायटी या स्वयंसेवी संस्थेशी संबंधित आणखी दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

Maharashtra : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेस सुरुवात; अनिकेत मांगडे, पृथ्वीराजची विजयी सलामी

करण राठोड ( वय 30) आणि  24 वर्षीय एक महिला  यांना पोलिसांनी अटक केलेली असून ते एनजीओमध्ये काम करतात. जीआरपीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले की, “आम्ही सिद्धार्थ या स्वयंसेवी संस्थेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. त्यांना एनजीओच्या कार्यपद्धतीची माहिती आहे आणि ते यात सामील होते. आम्ही त्यांना न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करू आणि त्यांची चौकशी करू.

 पीडित अल्पवयीन मुलीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोघे (Pune) जण मूळचे छत्तीसगड येथील आहेत. तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून थेट पुण्यात आणले. दरम्यान, मुलीच्या घरच्यांनी मुलगी बेपत्ता झाली असल्याची तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यात दिली होती.

Mumbai : श्री परशुराम अर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी सकल ब्राह्मण समाजाचे दुसऱ्या टप्प्याचे उपोषण जाहीर

या नंतर छत्तीसगडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात तिच्या प्रियकराविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलगी आणि तिचा प्रियकर हे दोघे पुणे रेल्वे स्थानकात आल्यावर आरोपी हवालदाराने मुलीला अल्पवयीन असल्याने तिला ताडीवाला रास्ता येथील एका खासगी संस्थेत ठेवले.

यावेळी मुलांच्या पालकांचा शोध घेऊन याची माहिती त्यांना देण्यात आली. दरम्यान, या अल्पवयीन मुलीवर संस्थेतील कर्मचारी तिवारी आणि हवालदार पवार या दोघांनी तिला एका खोलीत डांबून ठेऊन तिच्यावर बलात्कार केला.

छत्तीसगड पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन तिला पालकांच्या ताब्यात दिले. मुलीची चौकशी करण्यात आली. तेव्हा रेल्वे सुरक्षा दलातील हवालदार पवार आणि संस्थेतील कर्मचारी तिवारीने बलात्कार केल्याची माहिती तिने दिली.

त्यानंतर याप्रकरणी छत्तीसगडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात (Pune) बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.अधिक तपास पोलीस करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.